भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना ७५,००० पत्र पाठवणार

बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषेद घेवून आपण शिवसेनेला भीक घालत नाही, कोणाला घाबरत नाहीय, या सर्वांना मी पुरुन उरलो आहे असा इशारा दिला. तसेच येथून पुढे आपण पाऊल जपून टाकणार असं सुद्धा राणे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांचे अज्ञान पुढे आले आहे त्यावर मी फक्त बोललो यात चुकीचे काय? असं सुद्धा राणे बोलायला विसरले नाहीत.

    मुंबई – राज्यात शिवसेना भाजप असा वाद पेटला आहे, आणि कारण आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मंगळवारी राज्यातील विविध भागात शिवसैनिकांकडून आंदोलन करत राणेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर नारायण राणे यांना अटक आणि जामीन हे नाट्य तब्बल सात तास चालू होते.

    दरम्यान बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषेद घेवून आपण शिवसेनेला भीक घालत नाही, कोणाला घाबरत नाहीय, या सर्वांना मी पुरुन उरलो आहे असा इशारा दिला. तसेच येथून पुढे आपण पाऊल जपून टाकणार असं सुद्धा राणे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांचे अज्ञान पुढे आले आहे त्यावर मी फक्त बोललो यात चुकीचे काय? असं सुद्धा राणे बोलायला विसरले नाहीत.

    आता या सर्व पाश्र्वभूमीवर देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष की, हीरक महोत्सवी वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही हे राज्याचं दुर्दैव आहे. राज्यातील युवांच्या तर आता कोणत्याच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून उरलेल्या नाही.

    किमान देशाचे अमृत महोत्सव वर्ष तरी निष्क्रिय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहवे. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाक़डून मुख्यमंत्र्यांना ७५,००० पत्र पाठवणार आहे. याची सुरुवात अमरावती शहर येथे आज करण्यात आली. अशी माहिती विक्रांत पाटील, प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांनी दिली.