भाटीया हॉस्पिटलमधील आणखी ८ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ४३ वर

मुंबई : भाटिया हॉस्पिटलयातील २ डॉक्टर, ५ नर्स आणि एका सुरक्षारक्षकाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भाटिया हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची संख्या

 मुंबई : भाटिया हॉस्पिटलयातील २ डॉक्टर, ५ नर्स आणि एका सुरक्षारक्षकाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भाटिया हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित डॉक्टर, परिचारिका आणि  कर्मचाऱ्यांची संख्या ४३ वर पोहोचली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.  भाटिया हॉस्पिटलमधील आठ  कर्मचारी सदस्य कोरोना बाधित झाले असून त्यात २ डॉक्टर, ५ परिचारिका आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. भाटियामधील आयसीयू केअर युनिटमध्ये या  बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. उर्वरित पॉझिटिव्ह कर्मचार्‍यांची तब्येत बरी आहे. ११ कर्मचार्‍यांनी कोव्हिड-१९ ची चाचणी दोनवेळा निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले आहे. तर त्यांना १४ दिवस घरात अलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.