shanti sagar bhatnagar puraskar

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दिला जाणाऱ्यांमध्ये पुण्याचे डॉ. अमोल कुलकर्णी यांचा समावेश असून ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत.

मुंबई : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी प्रतिष्ठेचा शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार (Bhatnagar award ) यंदा राज्यातील (4 scientists) यांना जाहीर (announced) झाला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दिला जाणाऱ्यांमध्ये पुण्याचे डॉ. अमोल कुलकर्णी यांचा समावेश असून ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत. अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांचा निर्मितीसाठी वापर केल्या जाणाऱ्या रासायनिक भट्ट्यांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे कार्य केले आहे.


तसेच भारतातील पहिली मायक्रोरि ॲक्टर लॅबोरेटरी उभारण्याचा मान डॉ. कुलकर्णी यांच्याकडे आहे. डॉ. सूर्य़ेदू दत्ता आणि डॉ. यू.के आनंदवर्धनन आयाआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. डॉ.दत्ता हे भूवैज्ञानिक असून डॉ. आनंदवर्धन गणित वैज्ञानिक आहेत. डॉ. दासगुप्ता भाभा. अणू संशोधन केंद्रात काम करतात. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या ७९ व्या वर्घापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.