सुरेंद्र गडलिंग यांना अंतरिम जामीन; कठोर अटीशर्तींसह आईच्या वर्षश्राद्धासाठी परवानगी

गडलिंग यांच्या आईचे गतवर्षी ऑगस्टमध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. मात्र त्यांचे काही विधी आणि शोकसभा अद्यापही पार पडलेली नाही. वर्षपूर्तीच्या आधी हे विधी करण्यासाठी जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत सुरेंद्र गडलिंग यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

    मुंबई : भीमा-कोरगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वकिल सुरेंद्र गडलिंग यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. दिवंगत आईच्या श्राद्ध विधीला उपस्थित राहता यावे म्हणून १३ ते २१ ऑगस्टदरम्यान त्यांना अंतरिम तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात नक्षलवादी तसेच दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोपाखाली सुरेंद्र गडलिंग यांना जून २०१८ मध्ये अटक करण्यात आली आहे. गडलिंग यांच्या आईचे गतवर्षी ऑगस्टमध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. मात्र त्यांचे काही विधी आणि शोकसभा अद्यापही पार पडलेली नाही. वर्षपूर्तीच्या आधी हे विधी करण्यासाठी जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत सुरेंद्र गडलिंग यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. एस. एस. शिदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निर्णय व्हिसीमार्फत पार पडलेल्या सुनावणीदरम्यान जाहीर केला. त्यानुसार, गडलिंग यांना १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करताना ५० हजारांच्या दोन हमी विशेष एनआयए न्यायालयात जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

    तसेच नागपूरबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून १९ ऑगस्टला बिना नदीकाठी अस्थी विसर्जनाव्यतिरिक्त इतर कुठेही जाण्यास बंदी घातली आहे. याशिवाय १६ आणि १९ ऑगस्टला तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात सकाळी १० वाजता हजेरी बंधनकारक असणार आहे.

    Bhima Koregaon violence case Interim bail to Surendra Gadling Permission for mothers annuity with strict conditions