भीमा कोरेगाव हिसांचार प्रकरण: स्टॅन स्वामीं ७ जुलैपर्यंत होली फॅमिली रुग्णालयातच

भीमा-कोरेगाव हिंसाचार (the Bhima-Koregaon violence) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad cases) प्रकरणात अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते फादर स्टैन स्वामी (८४) (Father Stan Swamy) यांना पुढील मंगळवारपर्यंत खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्याचे आदेश शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

    मुंबई (Mumbai). भीमा-कोरेगाव हिंसाचार (the Bhima-Koregaon violence) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad cases) प्रकरणात अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते फादर स्टैन स्वामी (८४) (Father Stan Swamy) यांना पुढील मंगळवारपर्यंत खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्याचे आदेश शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

    भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले स्टॅन स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार आहे. स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्द्यावर विशेष एनआयए सत्र न्यायालयात दाखल केलेला सुटकेसाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यांची तब्येत ढासळती तब्येत पाहता न्यायालयाने स्वामी यांना १५ दिवस होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

    त्यात आपणखी वाढ करून करण्यात आली होती. या जामीन अर्जावर शनिवारी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. यावेळी अ‍ॅड. मिहिर दसाई यांनी स्वामी यांच्यावर आयसीसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिली. न्यायालयाने याची दखल घेत ७ जुलैपर्यंत त्यांना रूगणालयातच राहू देण्याचे निर्देश कारागृह प्रशासन आणि राज्य सरकारला देत सुनावणी ६ जुलै पर्यंत तहकूब केली.

    याच प्रकरणात अटकेत असलेल्या प्रा. आनंद तेलतुंबडे आणि वर्नान गोंन्साव्हिस यांच्या पत्नींनी तळोजा कारागृह अधिक्षकांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कारागृह अधिक्षक हे तेलतुंबडे आणि गोंन्साव्हिस यांना त्यांच्या पत्नी तसेच वकिलांना पत्र लिहिण्यास मनाई करत आहेत. अधिक्षकांचे कृत्य हेतु पुरस्सर आणि द्वेषपूर्ण असून कैद्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचा दावा याचिकेतून केला असून अधीक्षकांची चौकशी कऱण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत सुनावणी १४ जुलैपर्यत तहकूब केली.