भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता जप्त; आयकर विभागाने कारवाई केल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने मरीनड्राइव्हच्या अल-जबेरिया कोर्ट ही इमारत बेहिशोबी मालमत्ता म्हणून सील केली आहे. या इमारतीची बाजार भावानुसार किंमत 100 कोटी आहे. ज्या कंपनीने या इमारतीची खरेदी केली होती. चौकशीत या कंपनीकडे इमारत खरेदी करण्याच्या अनुषंगानेन पुरेसे पैसेही नव्हते. या इमारतीची भुजबळ यांच्याविरूद्ध मनी लाँड्रिंग प्रकणात ईडीने चौकशीही केली होती. ईडीला महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरला असल्याचा संशय होता.

  मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभाग (इन्वेस्टिगेशन) मार्फ़त सेशन कोर्ट मुंबईत दावा दाखल करत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सूत्राने दिली. सोमय्या, आणि माहिती अधिकार कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

  …तर 7 वर्षांची शिक्षा

  सत्र न्यायालयात बेनामी ट्रान्झॅक्शनच्या अंतर्गत फौजदारी प्रक्रिया दावा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना 7 वर्षापर्यंतची सजा होऊ शकते, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

  ईडीने केली होती चौकशी

  सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने मरीनड्राइव्हच्या अल-जबेरिया कोर्ट ही इमारत बेहिशोबी मालमत्ता म्हणून सील केली आहे. या इमारतीची बाजार भावानुसार किंमत 100 कोटी आहे. ज्या कंपनीने या इमारतीची खरेदी केली होती. चौकशीत या कंपनीकडे इमारत खरेदी करण्याच्या अनुषंगानेन पुरेसे पैसेही नव्हते. या इमारतीची भुजबळ यांच्याविरूद्ध मनी लाँड्रिंग प्रकणात ईडीने चौकशीही केली होती. ईडीला महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरला असल्याचा संशय होता.

  ‘तो’ मी नव्हेच

  या संपत्तीशी माझा काहीही संबंध नाही. अर्शद सिद्दीकी हे या कंपनीचे मालक आहे. ही इमारत शेख जबार अब्दुल्लाह अल-सबाह यांच्या मालकीची होती. 24 डिसेंबर 2013 रोजी शेख जबार व मेसर्स असलिना एग्रो अॅड हॉल्टिकल्चर प्रायवेट लिमीटेड यांच्यात झालेल्या करारानुसार तिसध्या मेसर्स असलिना एग्रो अॅड हॉल्टिकल्चर प्रायवेट लिमीटेड यांच्या मालकीची झाली असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

  इमारत मालकाचे स्पष्टीकरण

  दुसरीकडे, आयकर विभागाने जप्त केलेल्या ‘अल-जेब्रीया कोर्ट’ या मरिन ड्राइव्हवरील इमारतीशी किंवा त्या इमारतीशी संबंधित व्यवहारांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कुठलाही संबंध नाही, असे स्पष्टीकरण या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी दिले आहे.

  मंगळवारी इन्कम टॅक्स विभागाने प्रेसनोट जारी केलीय. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, जी संपत्ती, बेनामी मालमत्ता त्यांनी त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती.

  - किरीट सोमय्या, भाजपा नेते

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]