दोषमुक्त झाल्यावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया,नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्य परेशान होता है पराजित नही' अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्य परेशान होता है पराजित नही’ अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.

    भुजबळ नेमकं काय म्हणाले?

    महाराष्ट्र सदन प्रकरण जगभर गाजलं. जे महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेल सारखं बांधलं गेलं त्याचा वापर अनेक राजकीय पक्ष करत आहेत. अंधेरी आरटीओ ऑफिस पण तसेच बनवण्यात आलं. कंत्राटदाराला 1 फूट जमीन किंवा एफएसआय मिळालेला नाहीये. 800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. जनतेच्या आशीर्वादामुळेच दोषमुक्त झालो. आमचा न्यायव्यवस्थेवर पर्ण विश्वास आहे. आज दु:खाचा पाढा वाचणार नाही, काही लोक अजूनही मला शांतपणे झोपू देणार नाही असंही भुजबळांनी म्हटलं आहे.

    ज्यांना हायकोर्टात जायचं आहे त्यांनी खुशाल जावं असं म्हणत छगन भुजबळ यांनी अंजली दमानींया यांना उत्तर दिलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.