राम मंदिराचे भूमिपूजन हे जल्लोषातचं व्हावं, राज ठाकरेंची मोठी भूमिका

  • ५ ऑगस्ट २०२० रोजी रामजन्मभूमीत राममंदिर बांधण्यासाठी भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुमिपुजन होणार आहे. तसेच हा कार्यक्रम इ-भूमिपूजन द्वारे करण्यात येणार आहे. रामजन्मभूमित भूमिपूजन सोहळा काही मोजक्याच सर्व धर्मीय लोकांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यंमंत्री वगळता कोणालाही आमंत्रण पाठविले नाही.

मुंबई – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे त्याचबरोबर कोरोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. परंतु राज्यातील राजकारणात एक नवीन मुद्धयावर वादंग सुरु आहे. हा मुद्धा राममंदिर बाबत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राममंदिराच्या भूमिपूजन बाबत आनंद व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की राममंदिराचे भूमिपूजन मोठी आनंदाची बातमी ते मोठ्या धूमधडाक्यात व्हायला हवे परंतु ती ही वेळ नाही. तसेच ई-भूमिपूजन मान्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

 ५ ऑगस्ट २०२० रोजी रामजन्मभूमीत राममंदिर बांधण्यासाठी भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुमिपुजन होणार आहे. तसेच हा कार्यक्रम इ-भूमिपूजन द्वारे करण्यात येणार आहे. रामजन्मभूमित भूमिपूजन सोहळा काही मोजक्याच सर्व धर्मीय लोकांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यंमंत्री वगळता कोणालाही आमंत्रण पाठविले नाही. 

परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राममंदिराच्या कार्यक्रमाबाबत विचारले असता ते म्हणाले की, राम मंदिर हे निश्चितचं झाले पाहिजे. अशी माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. राममंदिरासाठी असंख्या करसेवकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे राम मंदीराचे भूमिपूजन असेल तर ती अभिनास्पद गोष्ट आहे. त्यामुळे राम मंदिराचे भूमिपूजन हे व्हायलाचं हवं. पण ती ही योग्य वेळ नाही. आता लोक वेगळ्या विंवचनेत आहेत. भूमिपूजन आहे. एक दिवसाची बातमी आहे. पण लोकं त्या मानसिकतेत नाहीत. झालं तर आनंद आहे. ते मंदिर उभं राहिल तेव्हा जास्त आनंद होईल. परंतु आताच्या वेळी हे भूमिपूजन का ठेवले? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिराचे भूमिपूजन धूमधडाक्यात झाले पाहिजे. मग ते २ महिन्यांनी झाले तरी चालेल. लोकांच्या मनातील कोरोनाची भिती दूर झाल्यावर झाले तरी चालेल. सर्व परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर भूमिपूजन झाले तरी चालेल. लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे राम मंदिराचे भूमिपूजन जल्लोषातच व्हायला हवे ते ई-भूमिपूजन नको. 

याबरोबरच राजकीय घडामोडींवरही राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कोरोना संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात राज्यसकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकाण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होत.