cm

मुंबई : कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातली आर्थिक घडी बसविण्यासाठी ४० हजार एकर जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव ठेवत आहोत.यासाठी नव्या उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक

मुंबई : कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातली आर्थिक घडी बसविण्यासाठी  ४० हजार एकर जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव ठेवत आहोत.यासाठी  नव्या उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठीचे आवाहन करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नवीन उद्योगांसाठी नवं पर्व राज्यात सुरु करणार असून परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतल्याने भूमिपुत्रांना संधी आहे. मराठी तरुणांनी याचा लाभ घ्या असे ठाकरे यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा घोषीत करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधत  कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून काय उपाय योजना राबवल्या जात आहेत, याबाबत  चर्चा केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोन ग्रीन झोन करण्याचे आव्हान असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुळे  परराज्यातले कामगार निघून गेले आहेत. त्यामुळे  राज्यातल्या भूमिपुत्रांनी ग्रीन झोनमध्ये काम करुन राज्य वाचवायचे आहे राज्यातल्या उद्योगांना मनुष्यबळ कमी पडणार नाही, यासाठी सगळ्यांनी पुढे  यावे असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.