HDFC बँकेवर नॅशनल हाऊसिंग बँकेकडून मोठी कारवाई ; ठोठावला लाखो रुपयांचा दंड

भांडवली मूल्यानुसार एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. शेअर बाजारातील कंपनीचे एकूण मूल्य 8.26 लाख कोटी इतके आहे. या बँकेत सध्याच्या घडीला 1.16 लाख कर्मचारी आहेत.

    मुंबई:NHB ने एचडीएफसी बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेवर नॅशनल हाऊसिंग बँकेकडून (NHB) कारवाई करण्यात आली आहे.

    कोरोनाकाळात HDFC बँकेकडून मोठ्याप्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले होते. बँकेने कर्ज म्हणून दिलेल्या रक्कमेचा आकडा 30 जूनपर्यंत 11.47 लाख कोटींवर पोहोचला होता. तर बँकेने वाटप केलेल्या होम लोनमध्येही 10.5 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.

    भांडवली मूल्यानुसार एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. शेअर बाजारातील कंपनीचे एकूण मूल्य 8.26 लाख कोटी इतके आहे. या बँकेत सध्याच्या घडीला 1.16 लाख कर्मचारी आहेत.

    भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank) समावेश आहे.