MPSC परीक्षांबाबत मोठी घोषणा; ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमपीएससीने 14 मार्च 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन केले. मात्र, आता हेच विद्यार्थी 11 एप्रिलची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत होते.

    मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने MPSC परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

    11 एप्रिलला MPSC ची परीक्षा होणार होती. मात्र, राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमपीएससीने 14 मार्च 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन केले. मात्र, आता हेच विद्यार्थी 11 एप्रिलची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत होते.

    दरम्यान, एमपीएससीची 21 मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या 11 एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी करीत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करीत असलेल्या वैभव शितोळे या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या नंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला.