बंगालमध्ये भाजपला मोठा झटका , ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळण्याची चिन्हे?; महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची रंगली होती चर्चा, वाचा सविस्तर

 फेब्रुवारी २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असं फडणवीस म्हणाले होते. 

    मुंबई: पश्चिम बंगालचे निकाल लागताच महाराष्ट्रात सत्तांतर होणार असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच सत्ता आल्याने भाजपचा अपेक्षा भंग झाला आहे. त्यामुळे भाजपचं ‘मिशन महाराष्ट्र’ही बारगळण्याची चिन्हे दिसत आहे.

    फेब्रुवारी २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असं फडणवीस म्हणाले होते.

    पवार- अमित शहा भेट

    मार्च महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. ही गुप्त बैठक होती. मात्र, एका वृत्तपत्राने या भेटीचं वृत्त देऊन एकच खळबळ उडवून दिली होती. या भेटीनंतर बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असंही म्हटलं जात होतं. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया देऊन संभ्रमात भर टाकली होती.