ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! चार बड्या अधिका-यांच्या बदल्या

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने चार ज्येष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून  डॉ महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सध्याच्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागात संचालक या पदावर करण्यात आली आहे.

    मुंबई : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने चार ज्येष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून  डॉ महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सध्याच्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागात संचालक या पदावर करण्यात आली आहे.

    या शिवाय मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात सह सचिव पदावर कार्यरत एम बी वारभुवन यांची ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त आदिवासी आयुक्त या पदावर करण्यात आली आहे.

    तर, सध्या ठाणे अतिरिक्तआयुक्त पदावर कार्यरत संजय मिणा याची बदली गडचिरोली जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली असून या पदावर सध्या कार्यरत असलेले दिपक सिंगला यांची नियुक्ती विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव या पदावर करण्यात आली आहे.