प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

डिसेंबर (December) महिन्यातील १९ दिवसांत मुंबईतील (Mumbai) मालमत्तांच्या नोंदणीने १० हजार ४५७ चा आकडा गाठला आहे. घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी मोठय़ा संख्येने ग्राहक नोंदणी कार्यालयात येत आहेत.

मुंबई : राज्य सरकारने ( state government ) मुद्रांक शुल्काबाबत (stamp duty) निर्णय घेतल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्यातील १९ दिवसांत मुंबईतील (Mumbai) मालमत्तांच्या नोंदणीने १० हजार ४५७ चा आकडा गाठला आहे. घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी मोठय़ा संख्येने ग्राहक नोंदणी कार्यालयात येत आहेत. हा प्रतिसाद पाहता डिसेंबरअखेपर्यंत घरांच्या विक्रीत आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे बाजार ठप्प झाल्याने त्यात आणखी भर पडली. ‘नाईट फँक’ संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई आणि एमएमआर मिळून जूनअखेर सुमारे दीड लाख घरे विक्रीच्या प्रतीक्षेत होती. दरम्यान करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत जाहीर केली.

मागील दोन-तीन वर्षांत घरांच्या किमतीही १५ ते १७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सध्या राज्य सरकारच्या सवलतीमुळे यात भर पडली आहे. विकासकांनी सवलती सुरूच ठेवल्या तर भविष्यात घर घेण्याच्या विचारात असलेले ग्राहकही आताच नोंदणी करतील. ग्राहकांकडून सध्या तयार घरांना अधिक मागणी आहे. परिणामी, प्रकल्प लवकर पूर्ण करण्याकडे विकासकांचा कल आहे, अशी माहिती नाइट फ्रँकच्या संशोधन विभागाचे संचालक विवेक राठी यांनी दिली.