दहावी, बारावी परीक्षे संदर्भात मोठा निर्णय; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची घोषणा

  मुंबई : मुंबई : दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच होणार आहे. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

  कोरोनाची परिस्थिती आहे, त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाल्या. त्या अनुषंगाने वर्षा गायवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत परिक्षेच्या अनुषंगाने काही म्हत्वाचा सुचना जारी केल्या आहेत.

  परीक्षा या विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमध्येच होणार आहेत. तसेच कोरोनाची लागण झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी दिली जाणार आहे. जुन महिन्यात या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.

  वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार
  • शाळा बंद असल्याने मुलांचा लिखानाचा सराव कमी झाला असल्याने विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी अर्धा तासांचा अधिक वेळ वाढवून दिला जाणार आहे. म्हणजेच तीन तासांच्या पेपर साठी साडे तीन तासांचा वेळ मिळणार आहे. ११ वाजताचा पेपर साडे दहा वाजता सुरु होणार आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही त्यांची परीक्षा जूनमध्ये घेतली जाणार आहे.
  • शाळांमधील परीक्षा केंद्रावरील जागा कमी पडल्यास अथवा शाळा कंटेन्मेंट झोन परिसरात तसेच क्वारन्टाईन सेंटर असल्यास नजीकच्या केंद्रावर विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याची सोय केली जाईल.
  • परीक्षा केंद्रावर मास्क, सॅनिटायजर तसेच सर्व नियमांचे काटोकोर पालन केली जाईल
  • दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान होईल.
  • बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल.
  • लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होईल.
  • २२ मे ते १० जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.
  • ४० ते ५० मार्कांच्या पेपरसाठी १५ मिनिटं जास्त वेळ देण्यात येईल.
  • दिव्यांग विद्यार्त्यांना पेपरसाठी १ तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येईल.
  • पास होण्यासाठीच्या ३५ मार्कांच्या पातळीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.