ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय ; जाणून घ्या काय आहे

सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी, वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी यासंबंधी कागदपत्रांची वैधता ही 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कागदपत्रे तपासणारे अधिकारी 30 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करू शकणार नाहीत.

    रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना, नोंदणी यासारख्या ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपत होती, त्यांची वैधता आता सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    जर तुमच्याही ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना, नोंदणी यासह इतर कोणत्याही कागदपत्रांची वैधता वाढवायची असेल तर काळजी करू नका. कारण नुकतंच सरकारने कागदपत्रांची वैधता वाढवण्याची मुदत सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एक परिपत्रक देऊन यासंदर्भात माहिती दिली आहे.

    यासोबतच वाहन दुरुस्ती, सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी, वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी यासंबंधी कागदपत्रांची वैधता ही 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कागदपत्रे तपासणारे अधिकारी 30 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करू शकणार नाहीत.