पश्चिम रेल्वेवर दहा वातानुकुलित लोकल फेऱ्यांसह अतिरिक्त फेऱ्यांबाबत मोठा निर्णय, सोशल डिस्टन्सिंगसाठी होणार मदत

 पश्चिम रेल्वेवर (Western Railway) दहा वातानुकुलित (ten air-conditioned local rounds) लोकल फेऱ्यांसह एकूण १९४ अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय (Decision) घेण्यात आला आहे. यामध्ये येत्या गुरूवारपासून पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या एकूण फेऱ्यांची संख्या ही ५०६ वरून ७०० इतकी होणार आहे. त्याचप्रमाणे लोकल प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचा (social distancing) कुठेही फज्जा होणार नाही. या गोष्टीची देखील काळजी घेतली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या वाढविण्यात आलेल्या १९४ फेऱ्यांमध्ये सकाळच्या गर्दीतील ४९ आणि संध्याकाळच्या गर्दीतील ४९ फेऱ्यांचा समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी म्हटले आहे. १५ ऑक्टोबरपासून वाढविलेल्या १४९ फेऱ्यांमध्ये ५१ फेऱ्या चर्चगेट ते विरार सेक्टरमध्ये, ९६ फेऱ्या बोरीवली ते चर्चगेट सेक्टरमध्ये, ९ फेऱ्या भाईंदर ते विरार, १२ फेऱ्या नालासोपारा ते चर्चगेट, ९ फेऱ्या चर्चगेट ते भाईंदर, २ फेऱ्या वसई ते चर्चगेट, ८ फेऱ्या वांद्रे ते बोरीवली, ८ फेऱ्या चर्चगेट ते भाईंदर दरम्यान वाढवल्या आहेत.