सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, आज किती रुपयांनी महागले सोने? : जाणून घ्या सविस्तर

करोनाच्या नव्या व्हेरिएंटने पाश्चिमात्य देशामध्ये नव्याने संकट उभं राहिले आहे. त्यामुळे बड्या गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीमधील गुंतवणूक वाढवली आहे. आज जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.४ टक्क्यांनी वधारला असून तो १७९८.४६ डॉलरपर्यंत गेला आहे. दरम्यान मागील तीन आठवड्यातील हा सोन्याचा उच्चांकी दर आहे.

    मुंबई : करोनाच्या नव्या व्हेरिएंटने पाश्चिमात्य देशामध्ये नव्याने संकट उभं राहिले आहे. त्यामुळे बड्या गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीमधील गुंतवणूक वाढवली आहे. आज जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.४ टक्क्यांनी वधारला असून तो १७९८.४६ डॉलरपर्यंत गेला आहे.

    दरम्यान मागील तीन आठवड्यातील हा सोन्याचा उच्चांकी दर आहे. यामुळे आज कमॉडिटी बाजारात सोने ३५० रुपयांनी महागले आहे. सध्या एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७६६३ रुपये आहे. त्यात ३६७ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ७०५५१ रुपये आहे. त्यात ५१२ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी देखील सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती.

    गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५४० रुपयांनी वधारला होता. तत्पूर्वी त्याने ४६३०० रुपयांचा स्तर गाठला होता. जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.४ टक्क्यांनी वाढला आणि तो १७९८.४६ डॉलर प्रती औंस झाला. तसेच यूएस गोल्ड फ्युचर्समध्ये देखील ०.८ टक्क्याची वाढ झाली आहे. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव १७९८.१० डॉलर प्रती औंस आहे. चांदीमध्ये ०.५ टक्के वाढ झाली आणि चांदीचा भाव २६.५८ डॉलर प्रती औंस झाला आहे.

    दरम्यान १७ जून २०२१ नंतर जागतिक कमॉडिटी बाजारातला सोन्याचा हा सर्वाधिक दर आहे. Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६४४० रुपये झाला आहे.

    मुंबईत आज २४ कॅरेटचा भाव ४७४४० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५१० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०५१० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४९०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८९८० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९२० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९६२० रुपये आहे. ऑगस्ट २०२० मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव ५६२०० रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकी स्तरावर गेला होता. आजच्या घडीला सोन्याचा भाव ९००० रुपयांनी कमी झाला आहे.