Collect citizen signatures against agricultural laws; Appeal of MLA Kapil Patil

कपिल पाटील यांच्यासठी ही मोठीच लॉटरी आहे असे म्हटले तरी चालेल. पण राजकारणात ते कायम नशीबवान ठरले आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद असो वा ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असो कपिल पाटील यांना आपोआप ती पदे मिळत गेली. आता केंद्रीय मंत्रीपदही चालत आले आहे.

    मुंबई : कपिल पाटील यांच्या रूपाने भाजपाने एका आगरी नेत्याला प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिलेली आहे. खरेतर ठाणे जिल्ह्यालाही प्रथमच मोठी संधी कपिल पाटील यांच्या रुपाने मिळते आहे. गेल्या तीस वर्षात या जिल्हयाला केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान नव्हते. फार पूर्वी काँग्रेसने एकदा काही काळासाठी शांताराम पोटदुखेंना संधी दिली होती. पण त्यांचा मतदारसंघ आता पालघर जिल्ह्यात गेला आहे.

    कपिल पाटील यांच्यासठी ही मोठीच लॉटरी आहे असे म्हटले तरी चालेल. पण राजकारणात ते कायम नशीबवान ठरले आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद असो वा ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असो कपिल पाटील यांना आपोआप ती पदे मिळत गेली. आता केंद्रीय मंत्रीपदही चालत आले आहे.

    दि. बा . पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आगरी समाज आग्रही व आक्रमक होत असताना पाटील यांना मंत्रीपद दिले जाते आहे. शिवसेनेला हे आणखी एक आव्हान आहे. ठाणे जिल्हयातील सेनेचे महत्व व बळ कमी करण्यासाठी कपिल पाटील यांना ताकद देण्याचे काम पक्षाने केले आहे असे मानले जात आहे.