Big movement of police families in Aditya Thackeray's constituency; MNS's written support for the fight

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या वरळीत पोलीसांच्या बीडीडी चाळीतील घरांबाबत अनेक राजकीय पक्षांनी आजवर केवळ आश्वासनांची गाजरे दाखविली आहेत. पोलीसांच्या बीडीडी चाळीतील घरांचा प्रश्न सुटावा म्हणून पोलीस परिवारानं पुढाकार घेऊन “घरं नाही तर, मतं नाही” ही नवी चळवळ सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत आज सामाजिक क्षेत्रातील अनेक  मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.

    मुंबई : उत्तर प्रदेश, बिहारमधील परप्रांतियच नव्हे तर बांगलादेशीसुद्धा मुंबईत येऊन झोपड्या बांधतात आणि त्यांच्याही झोपड्या नावावर होतात, मग पोलीसांच्या नावावर घरे का नाहीत? जोपर्यंत बीडीडी चाळीत पोलीसांच्या नावांवर घरे होत नाहीत तोवर हक्कांच्या घरांसाठी सुरू असलेला पोलीस परिवाराचा लढा सुरूच राहिल, असा निर्धार पोलीस परिवारानी केला आहे. पोलीसांच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा ताटकळत पडलेला प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचीही भूमिका पोलीस परिवारानी घेतली. घरासाठी पोलीस पुत्रांच्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लेखी पाठिंबा जाहीर केला आहे.

    सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या वरळीत पोलीसांच्या बीडीडी चाळीतील घरांबाबत अनेक राजकीय पक्षांनी आजवर केवळ आश्वासनांची गाजरे दाखविली आहेत. पोलीसांच्या बीडीडी चाळीतील घरांचा प्रश्न सुटावा म्हणून पोलीस परिवारानं पुढाकार घेऊन “घरं नाही तर, मतं नाही” ही नवी चळवळ सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत आज सामाजिक क्षेत्रातील अनेक  मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.

    मनसेचा लेखी पाठिंबा जाहीर

    पोलीसांच्या हक्काच्या घरासाठी सुरू असलेला लढा यापुढेही सुरूच राहणार. पुरे झालीत तुमची तोंडी आश्वासने ! आता हवाय लेखी पाठिंबा, असेही पोलीस परिवारातल्या तरूणांनी राजकीय पक्षांना ठणकावून सांगितले. पोलीस पुत्रांच्या या भावना कळताच मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी पोलीस परिवाराची भेट घेऊन त्यांना मनसेचा लेखी पाठिंबा जाहीर केला. मनसे प्रमुख राज ठाकरे नेहमीच पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आझाद मैदान दंगलीच्या प्रसंगी पोलीसांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणारा मनसे हा एकमेव राजकीय पक्ष होता. त्यामुळे पोलीसांच्या घराच्या लढ्यातही मनसे उतरणार असल्याचेही संतोष धुरी यांनी आश्वासन दिले.

    उद्धव ठाकरेंना पत्र लिहीणार

    मनसेच्या लेखी पाठिंब्यानंतर उद्या परवा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसही आपला लेखी पाठिंबा जाहीर करतील असा विश्वास आहे. पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही आहोत. आता पोलीस परिवारातील प्रत्येक घराघरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीली जातील, असेही पोलीस परिवारातील सदस्यांनी सांगितले आहे.