गृहमंत्री अनिल देशमुखांना पदावरुन हटवण्याबाबत मोठी अपडेट; राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

गृहमंत्री अनिल देशमुखचं राहणार आहेत. त्यांच काम व्यवस्थित सुरु आहे. यामुळे कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही असं जयंत पाटील म्हणालेत. राज्यातील गृहमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर सोपवली जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीच सापडले असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    गृहमंत्री अनिल देशमुखचं राहणार आहेत. त्यांच काम व्यवस्थित सुरु आहे. यामुळे कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही असं जयंत पाटील म्हणालेत. राज्यातील गृहमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर सोपवली जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या काही तास बैठक चालली. यानंतर राष्ट्रवादीची देखील बैठक झाली.

    राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर जयंत पाटील गृहमंत्री अनिल देशमुखांना पदावरुन हटवण्याबाबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येणार नाही. गृहमंत्री बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.