sachin vaze and mansukh hiren video

वालचंद हिराचंद मार्ग परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ(cctv video footage) समोर आला आहे. मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंच्या भेटीचा हा व्हिडिओ(mansukh hiren and asachin waze meeting video) आहे. या व्हिडिओमध्ये सचिन वाझे मर्सिडीज कार घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. मनसुख हिरेन मग कारजवळ येऊन त्यात बसत आहेत.

  मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा(mansukh hiren case) तपास सध्या एनआयए करत आहे. या तपासादरम्यान एक सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन स्वत: जाऊन सचिन वाझेंच्या गाडीत बसत असल्याचे दिसत आहे.

  वालचंद हिराचंद मार्ग परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ समोर आला आहे. मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंच्या भेटीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सचिन वाझे मर्सिडीज कार घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. मनसुख हिरेन मग कारजवळ येऊन त्यात बसत आहेत.

  सचिन वाझेंकडून जी मर्सिडीज कार जप्त करण्यात आली होती तीच या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एनआयएच्या हाती लागलेला हा व्हिडिओ १७ तारखेचा आहे.

  याआधी काय घडलं होतं ?

  २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास सुरू आहे. या दरम्यानच्या काळात या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्कॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदरच्या खाडीत आढळून आला होता.

  या प्रकरणी विरोधकांनी वाझेंवर खळबजनक आरोप केले. तसेच वाझेच्या अटकेती मागणी करत विरोधकांनी विधानसभेत मोठा गदरोळ घालत होता. विरोधकांच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १० मार्च रोजी सभागृहातून वाझे यांना क्राइम ब्रांचमधून हटवण्यात आल्यांची घोषणा केली. त्यानंतर १२ मार्च रोजी रात्री उशीरा त्यांना क्राइम ब्रांचमधून नागरी सुविधा केंद्र विभागात हलवण्यात आले. सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरु आहे.