sachin waze

वाझे यांचे टॉपचे अधिकारी परमबीर सिंह असल्याने संशयाची सुई त्यांच्याभोवती रेंगाळत आहे. मोठा वरदहस्त असल्यानेच वाझे डीसीपीसारख्या अधिकाऱ्यांना देखील जुमानत नव्हते. परमबीर यांना आयुक्त पदावरून हटविल्यानंतर आता एनआयए त्यांना देखील चौकशीसाठी बोलविणार असल्याचे बोलले जात आहे.एनआयएने स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि मर्सिडीज जप्त केली आहे.

    प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यात आली होती. या कटातील मुख्य सूत्रधार म्हणून मुंबई पोलिसांचे क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. १३ मार्चला अटक झाल्यानंतर सचिन वाझेने एनआयएला आपणच प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि जुने नाव पुन्हा मिळविण्यासाठी कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्य़ावरून हा कट रचला होता, अशी कबुली दिल्याचे तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

    बई

    या प्रकरणी आणखी दोन गाड्यांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये आणखी एक मर्सिडीज कार आणि स्कोडा कार आहे.दुसरीकडे जप्त केलेल्या मर्सिडीजचा मालक समोर आला आहे. त्याने ही कार ऑनलाईन सेंकंड हँड कार डीलर कंपनी कार २४ ला ही कार विकल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आपला काही सहभाग नाहीय, तपासात सहकार्य़ करणार असल्याचे सांगितले आहे.