मुंबई, ठाण्यापाठोपाठ कोकणातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने खळबळ; प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात

मुंबई : कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता परभणीपाठोपाठ मुंबई, ठाणे, बीड, तसेच रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात केल्या आहेत. तसचे ग्रामपंचायत, वन विभाग, पाटबंधारे विभाग पातळींवर निगराणीचे आदेशही दिले आहेत.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव केला आहे. परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची माहिती समोर आली आहे. बीड आणि लातूर मधील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत.

परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आले असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील अनेक भांगामध्ये कोंबड्या, कावळे आणि इतर पक्षांचा मृत्यू झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. त्यानंतर आता महाराष्ट्रातही धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.