खाताबुकने घेतला बिझ ॲनालिस्टचा ताबा

हा व्यवहार म्हणजे पुरवठा साखळीत आमच्या नेटवर्क इफेक्ट्सला अधिक दृढ करण्याच्या आणि मॉनिटायझेशनवर भर देण्याच्या मार्गावरील आमचे पहिले धोरणात्मक संपादन आहे. बिझ ॲनालिस्टची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या क्षमता एकप्रकारे आमच्या सध्याच्या व्यवसाय पोर्टफोलिओचा सुसंगत असा विस्तार आहेत.

    मुंबई : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या समसया सोडवणे आणि अर्थपूर्ण बदल करणे तसेच देशातील एमएसएमईजना सक्षम करण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करून देणे, यासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून खाताबुक या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या फिनटेक स्टार्ट-अपने बिझ ॲनालिस्ट या आघाडीच्या SaaS बिझनेस मॅनेजमेंट ॲप्लिकेशनचा ताबा मिळवला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लघु उद्योगांना व्यवसाय वृद्धीच्या दृष्टिकोनातून अधिक फायदा होणार आहे. त्याशिवाय वितरक, होलसेलर, ट्रेडर्स आणि पुरवठादार अशा आपल्या पुरवठा साखळीत सखोल एकात्मिकता निर्माण करत खाताबुक वापरकर्ते आता बिझनेस ॲनालिटिक्स, सेल्स फोर्स ऑटोमेशन आणि डिजिटल इन्व्हॉइसिंगच्या माध्यमातून आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त वैशिष्ट्यांचा सहज वापर करू शकतात.

    याबद्दल खाताबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक रविश नरेश म्हणाले, “हा व्यवहार म्हणजे पुरवठा साखळीत आमच्या नेटवर्क इफेक्ट्सला अधिक दृढ करण्याच्या आणि मॉनिटायझेशनवर भर देण्याच्या मार्गावरील आमचे पहिले धोरणात्मक संपादन आहे. बिझ ॲनालिस्टची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या क्षमता एकप्रकारे आमच्या सध्याच्या व्यवसाय पोर्टफोलिओचा सुसंगत असा विस्तार आहेत. मूल्यवर्धित सेवांच्या माध्यमातून भारतातील एमएसएमईजना व्यावसायिक कार्यक्षमता पुरवण्याच्या खाताबुकच्या धोरणांमधील एक पुढचे पाऊल म्हणजे हे संपादन होय.”

    बिझ ॲनालिस्टचे संस्थापक वैभव वासा आणि मेहुल सुतारिया यांनी संयुक्त पत्रकात म्हटले आहे की, “खाताबुकची मूळ तत्त्वे आणि धोरणे आमच्या तत्त्वांशी मेळ खातात. अशा कंपनीसोबत हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही एकत्र येत आमच्या परवडणाऱ्या दरातील SAAS सोल्युशन आणि विविध विभागातील व्यवसायांना एकाच व्यासपीठावर जोडून घेत एसएमईजच्या डिजिटल अवलंबाची प्रक्रिया अधिक व्यापक करण्याचा आमचा उद्देश आहे. आमच्या प्रगतीच्या वाटेवरील हा नवा अध्याय सुरू होत असताना आमच्या टीमसाठी आम्ही मोठ्या आणि अधिक चांगल्या संधी निर्माण करू इच्छितो. त्यांना दैनंदिन व्यवहारांमध्ये येणाऱ्या समस्यांसाठी उत्पादने पुरवण्यावर आम्ही भर देणार आहोत.”

    मागील वर्षभरात अनेक एमएसएमई आणि किराणा दुकानांनी कार्यचलनात अधिक लवचिक होण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. या परिसंस्थेतील डिजिटल बदलांना चालना देत खाताबुक व्यासपीठाने १०० अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेचे १.४ अब्जांहून अधिक व्यवहार केले आहेत.