parambir singh and anil deshmukh

दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊद्या, अशा आशयाचं पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलं होतं. या पत्रावरून आता भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. अनिल देशमुख यांच्यावर तोंड बंद ठेवण्यासाठी दबाव असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. अनिल देशमुख यांच्या पत्रातील भाषेवरूनही चंद्रकांत पाटील यांनी संशय व्यक्त केलाय. 

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र पाठवून केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडालीय. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं थेट नाव आल्यामुळे विरोधी पक्ष भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केलीय.

    दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊद्या, अशा आशयाचं पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलं होतं. या पत्रावरून आता भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. अनिल देशमुख यांच्यावर तोंड बंद ठेवण्यासाठी दबाव असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. अनिल देशमुख यांच्या पत्रातील भाषेवरूनही चंद्रकांत पाटील यांनी संशय व्यक्त केलाय.

    अनिल देशमुखांनी लिहिलेल्या पत्रातील भाषा ही व्हॉट्सअपची भाषा असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. एखाद्याने व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवावा आणि तो तपशील आहे तसा पत्रात उतरवावा, असंच त्या पत्राकडं बघून वाटत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतलं आणि २४ तारखेला ते सार्वजनिक केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

    अनिल देशमुख यांनी या प्रकरणात आपली चौकशी करावी आणि सत्य काय ते तपासावं, अशी मागणी केलीय. या मागणीचे आणि पत्राचे तपशील त्यांनी ट्विट केले आहेत.