बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीवर भाजपचा बहिष्कार; पंकजा मुंडेंचा निर्णय

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीवर भाजपने बहीष्कार घातला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली.

    बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीवर भाजपने बहीष्कार घातला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री धनंजय मुंडे सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार घालण्याचा निर्णय मंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

    जिल्हा बँकेच्या 11 जागेवरील अर्ज बाद झाले होते. त्यामुळं 8 जागेसाठी ही निवडणूक होत आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे.

    दरम्यान औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीड जिल्ह्याला दिला नाही हे दुर्दैव आहे.  सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे कट कारस्थान सुरू केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.