BJP-Congress 'hoarding war'

देशभरात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, चिमुकल्यांची लस विदेशात पाठविल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने मोहीम सुरू केली आहे. या पोस्टर वॉरचे लोण आता मुंबईतही पोहोचले आहे. पंतप्रधान मोदींविरोधात दिल्लीनंतर आता मुंबईतही 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन?' अशी पोस्टरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली. त्यानंतर दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर आता फाडून टाकले.

  मुंबई : देशभरात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, चिमुकल्यांची लस विदेशात पाठविल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने मोहीम सुरू केली आहे. या पोस्टर वॉरचे लोण आता मुंबईतही पोहोचले आहे. पंतप्रधान मोदींविरोधात दिल्लीनंतर आता मुंबईतही ‘मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन?’ अशी पोस्टरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली. त्यानंतर दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर आता फाडून टाकले.

  भाजपा विरुद्ध काँग्रेस एकमेकांविरोधात आक्रमक झाले असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले होर्डींग संतापून भाजपा कार्यकर्त्यानी फाडले. होर्डिंग लावण्याच्या विरोधात भाजपा लोकप्रतिनिधींनी पंतनगर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर काँग्रेसनेही पोलीस ठाणे गाठत लोकशाहीने प्रश्न करणाऱ्याना भाजपचा दबाव का? असा सवाल करत दहशत माजवून होर्डिंग फाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसनेही मागणी केली आहे.

  एकीकडे तौक्ते वादळाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाहाकार उडवून लावला आहे. ते वादळ पूर्णतःहा शमले असताना आता राजकीय वादळ देशात घोंगावू लागले आहे. कोरोनाच्या लसीवरून राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर लावण्यात आले होते. मोदींवर निशाणा साधताना मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवाल विचारला होता. अशाच प्रकारची होर्डिंगबाजी काँग्रेसने घाटकोपरच्या राजावाडी, विक्रांत सर्कल येथे लावण्यात आली.

  मुंबईतील घाटकोपरमध्ये कोरोना लशीसंदर्भात टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली. ‘मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?’ आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. काँग्रेसकडून हे पोस्टर लावण्यात आले होते. दुपारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसने घाटकोपर परिसरात लावलेले होर्डिंज भाजपच्या कार्यकर्त्यांनी फडले. तसेच, होर्डिंग लावणाऱ्या विरूद्ध गुन्हा दखल करण्याची मागणी मुंबई पालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली आहे.

  या होर्डिंगबाजीनंतर भाजप कार्यकर्ते भलतेच आक्रमक होत भाजपा कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग फाडून फेकून टाकले आहेत. यावेळी खासदार मनोज कोटक आणि आमदार पराग शहा यांनी कार्यकर्त्यांसमवेत पंतनगर पोलीस ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीचा अवमान करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील भाजपच्या दडपशाही विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत होर्डिंग फाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

  भाजप कार्यकर्त्यांद्वारे पोर्स्टर फाडल्याच्या कृत्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला आहे. मुंबई काँग्रेस जनरल सचिव अमित शेट्टी यांनी सांगितले की, शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु, लोकशाहीविरोधी कृत्याचा निषेध आहे. भाजपने अशा कृत्यापासून आता दूर राहायला पाहिजे, असाही सल्ला शेट्टी यांनी दिला.

  काँग्रेस पक्षाद्वारे मुंबईत लावलेल्या पोस्टरवरून भाजप महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी सांगितले की, भारत दोन विषाणूंपासून लढत आहे, एक कोरोना आणि दुसरा काँग्रेस! ते म्हणाले, जेव्हा भारताला गरज पडली तेव्हा इतर देशांनी ऑक्सिजन रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर एवढेच नाही तर लसही दिली. वॅक्सीनचा कच्चा माल परदेशातून येतो आणि आंतरराष्ट्रीय एक्स्पोर्ट ऑब्लिगेशन अंतर्गत काही भाग परदेशात निर्यात करणे बंधनकाकर असते. असे पोस्टर लावणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडी सरकारने पेंडेमिक अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.