देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपती राजवटीच्या मागणीनंतर भेटीला महत्त्व

सचिन वाझे प्रकऱण ताजं असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र पाठवून केलेल्या गौप्यस्फोटामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. राज्यातील सरकारचे गृहमंत्रीच वसुलीचे आदेश देत असतील, तर त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी भाजपनं केलीय. त्याचप्रमाणं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीचा सूरदेखील भाजपमधून उमटू लागलाय. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबतची भेट महत्त्वाची मानली जातेय. 

    मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र पाठवून केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील घडामोडींनी वेग घेतलाय. त्यापूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ लावण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि सचिन वाझे प्रकरणावरून देवेद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत प्रश्न उपस्थित केले होते.

    सचिन वाझे प्रकऱण ताजं असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र पाठवून केलेल्या गौप्यस्फोटामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. राज्यातील सरकारचे गृहमंत्रीच वसुलीचे आदेश देत असतील, तर त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी भाजपनं केलीय. त्याचप्रमाणं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीचा सूरदेखील भाजपमधून उमटू लागलाय. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबतची भेट महत्त्वाची मानली जातेय.

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीसाठी सकाळीच राजभवनावर दाखल झालंय. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांसोबत होणारी चर्चा महत्त्वाची असणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, तर त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ही राज्यपालांची असते. राज्यपालांच्या सूचनेवरूनच केंद्र सरकार पुढील कारवाई करत असतं.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनाही पत्र पाठवलं होतं. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर याबाबत हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं आतापासून तयारी सुरू केल्याची चर्चा या भेटीमुळं रंगू लागलीय.