राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे

भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही पद्धतीला वैतागून एनडीएतील लोकाभिमुख असलेले जे राजकीय पक्ष आहेत ते त्यातून बाहेर पडत आहेत. भविष्यात एनडीए अस्तित्वात राहणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

मुंबई (Mumbai).  भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही पद्धतीला वैतागून एनडीएतील लोकाभिमुख असलेले जे राजकीय पक्ष आहेत ते त्यातून बाहेर पडत आहेत. भविष्यात एनडीए अस्तित्वात राहणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

भारतीय जनता पक्षाने संसदेमध्ये मंजूर केलेल्या कृषी कायद्याला देश पातळीवर शेतकऱ्यांचा एवढा मोठा विरोध होत असून देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा कृषी कायदा मागे घेण्यास तयार नाहीत. लोकसभेमध्ये हा कायदा संमत होत असताना भारतीय जनता पार्टीचा एक सहयोगी मित्र शिरोमणी अकाली दल यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आणि आपल्या राज्याच्या शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहण्याची भूमिका घेतली. आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी यांनी देखील भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत देशातील कास्तकार करतील.