भाजपा पदवीधर उमेदवार संदीप जोशी
भाजपा पदवीधर उमेदवार संदीप जोशी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक शपथपत्रातील त्रुटी प्रमाणेच नागपूरच्या पदवीधर मतदार संघ निवडणूकीत भाजपा उमेदवार संदीप जोशी यांनी देखील महत्वाची माहिती दडवल्याचा आरोप करत ऍड. सतीश ऊके यांनी त्यांच्या विरोधात प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे.  संदीप जोशी हे लाभाच्या पदावर आहेत आणि त्यांनी अनेक महत्वाची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवली  असल्याचा आरोप करताना ऍड ऊके  यांनी  भादवीच्या कलम १२५-अ R.P. Act  R/w १८१, १८२, १९९  आणि २००  प्रमाणे गुन्हा  दाखल  केला आहे .

मुंबई (Mumbai). माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक शपथपत्रातील त्रुटी प्रमाणेच नागपूरच्या पदवीधर मतदार संघ निवडणूकीत भाजपा उमेदवार संदीप जोशी यांनी देखील महत्वाची माहिती दडवल्याचा आरोप ऍड. सतीश ऊके यांनी केला आहे.  या संदर्भात त्यांनी जोशी यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. या आधारे जोशी यांच्या विरोधात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संदीप जोशी हे लाभाच्या पदावर आहेत आणि त्यांनी अनेक महत्वाची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवली  असल्याचा आरोप करताना ऍड ऊके  यांनी  भादवीच्या कलम १२५-अ R.P. Act  R/w १८१, १८२, १९९  आणि २००  प्रमाणे गुन्हा  दाखल  केला आहे .

अँँड. सतीश उके यांनी याबाबत मुख्य’ निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि  निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नागपूर यांना विस्तृत   माहिती  आणि त्यात चौकशी करून कारवाई करण्यास तक्रार दिली आहे.