भाजपा टवाळखोरांचा पक्ष; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल  प्रत्युत्तर

भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली. जो भाजपाला आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली जाते, असेही सावंत म्हणाले.

    मुंबई : भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली. जो भाजपाला आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली जाते, असेही सावंत म्हणाले.

    दरम्यान, नाना पटोले यांनी अदर पुनावाला यांच्या तक्रारीवरून सवाल केला. लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्राने रेमडेसिविर व लसींची निर्यात का केली हा प्रश्न उपस्थित केला.

    सर्वोच्च न्यायालयाने हेच प्रश्न विचारले असतानाही आशिष शेलार यांनी भाजपाची मुजोरपणाची परंपरा कायम राखली, अशा शब्दात त्यांनी शेलारांवरही टीका केली. उल्लेखनीय असे की शेलार यांनी नाना पटोलेंवर टीका करताना पटोले यांना कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, माहितीविना बोलणे म्हणजे कालाकांडी, असा उल्लेख शेलार यांनी केला होता.

    काँग्रेस नेत्यांनी मोदी सराकरच्या चुकना दाखवित सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टीका केली. काँग्रेस नेत्यांचा सल्ला वेळीच ऐकला असता तर देश आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते, अनेकांना प्रियजनांना मुकावे लागले नसते, निष्पाप बळी गेले नसते, स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची नाचक्की झाली नसती. याला केवळ भाजपाची मुजोरी, अकार्यक्षमता व अज्ञान जबाबदार आहे.

    - सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस