अमृता फडणवीसांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर साधला निशाणा

अमृता यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, बात निकली है त बहुत दूर तलक जाएगी,बादशाह क बचाने में कितनो की जान जाएगी ? या ओळीत त्यांनी सचिन वाझे आणि १०० कोटी असे हॅशटॅगही वापरले आहेत. दरम्यान त्यांनी आणखी एका ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फडणवीस महाविकासआघाडी सरकारवर याच प्रकरणावरुन निशाणा साधताना दिसत आहेत.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे पत्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तसेच यावरून विरोधकांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ठकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

    अमृता यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, बात निकली है त बहुत दूर तलक जाएगी,बादशाह क बचाने में कितनो की जान जाएगी ? या ओळीत त्यांनी सचिन वाझे आणि १०० कोटी असे हॅशटॅगही वापरले आहेत. दरम्यान त्यांनी आणखी एका ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फडणवीस महाविकासआघाडी सरकारवर याच प्रकरणावरुन निशाणा साधताना दिसत आहेत.

    दरम्यान या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, महाराष्ट्राच्या इतिहासात मी इतक्या वर्षात कधीच पाहिलं नाही की, पोलीस आयुक्त राहिलेला व्यक्ती थेट मुख्यमंत्र्याला पत्र लिहून इतक्या पुराव्यांसह सगळ्या गोष्टी सांगतात. आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना या आधीच माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी कारवाई का केली नाही ? असाही सवाल त्यांनी व्हिडीओमधून उपस्थित केला आहे.

    अमृता फडणवीस यांनी एक हिंदी मध्ये एक पोस्ट ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये म्हणाल्या की, ‘पचास इधर देंगा,पचास उधर देंगा. फिर धूर्त राजा कुछ क्यूँ बोलेंगा , अवाम को चूना लगाके खुद ऐश कारेंगा ! कोई कुछ बोला तो मनसुख जैसा मरेंगा ! चोर चोर मौसेरे भई ! मिल बाँट के नोट #MahaVasooliAghadi ने खई !’