पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजप आक्रमक

मुंबईतले रस्ते अद्यापही खड्डेमुक्त झालेले नाहीत, मालमत्ता कर आणि अशाच अनेक मुद्द्यांवर भाजपच्या वतीने महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील घणाघाती टीका केली. शेलार म्हणाले की, हे आंदोलन मुंबईकरांसाठी आहे, निवडणुकीसाठी नाही. हे आंदोलन तर फक्त एक ट्रेलर आहे ‘पिक्चर अभी बाकी आहे’, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

    मुंबई : खड्डेमुक्त रस्ते, मालमत्ता कर, भ्रष्ट कारभार, लसीकरण इत्यादी मुद्यांवर आज भाजपाने मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका विभागीय कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेने खड्डेमुक्त रस्ते, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणे अशा घोषणा केल्या होत्या. त्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत, त्याविरोधात भाजपने आंदोलन केले.

    मुंबईतले रस्ते अद्यापही खड्डेमुक्त झालेले नाहीत, मालमत्ता कर आणि अशाच अनेक मुद्द्यांवर भाजपच्या वतीने महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील घणाघाती टीका केली. शेलार म्हणाले की, हे आंदोलन मुंबईकरांसाठी आहे, निवडणुकीसाठी नाही. हे आंदोलन तर फक्त एक ट्रेलर आहे ‘पिक्चर अभी बाकी आहे’, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

    याबाबत शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भाजपच्या वतीने मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम प्रभाग समिती कार्यालयावर आम्ही मोर्चा काढला. शिवसेनेने मुंबईकरानां दिलेल्या ५०० चौ. फुटांच्या घरांना सवलतीची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच करोनाच्या या आपत्तीमध्ये मुंबईकरांना दिलासा देणे आवश्यक आहे, आणि त्यामुळे सर्व करात ५०% सवलत मिळाली पाहिजे अशा मागण्यांचे आज महापालिकेला निवेदन दिले!