कोरोनातून जीव वाचेल का? कामाला जाता येईल का? पगार मिळेल का? मुंबईकरांसमोर जगण्याचे असे असंख्य प्रश्न ; भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर साधला निशाणा

कोरोनातून जीव वाचेल का? कामाला जाता येईल का? पगार मिळेल का? चूल पेटेल का? लॉकडाऊन संपेल का? मुंबईकरांसमोर जगण्याचे असे असंख्य प्रश्न तर मुंबईचे सत्ताधारी कंत्राटांची खैरात वाटण्यात मग्न! लुटमार!! कधी नाल्यातील गाळाच्या नावाने तर आता समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या बहाण्याने!, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

    मुंबई महापालिकेनं मुंबईतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी समुद्रातील खाऱ्या पाण्याचं गोड पाणी करणारा अर्थात नि:क्षारीकरण करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. या प्रकल्पावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.