MPSC परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळावी ; भाजपा नेते आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

४ सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केल्याचं ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.

    मुंबई – ४ सप्टेंबर रोजी शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, यासाठी भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नवे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरून मागणी केली आहे. तसेच आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.अशा प्रकारचं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

    काय म्हणाले आशिष शेलार?

    ४ सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केल्याचं ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.

    राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली

    हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले. म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली. आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मा. रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे विद्यार्थ्यांतर्फे आभार, असं शेलार यांनी म्हटलं आहे.