aashish shelar

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय चांगला आहे. परंतु रेडी रेकनरचे दर अजूनही जाहीर का होत नाही आहेत. असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच रेडी रेकनरची फाईल पुण्याहून मुंबईला निघालेली ती अद्याप पोहचली नाही का ?

मुंबई : कोरोनामुळे सर्वच उद्योग धंदे मंदावले आहेत. त्यातच रिअल इस्टेट मार्केटला राज्य सरकारने दिलासा दिला आहे. यासाठी सरकारने मुद्रांक कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी येल असे सरकारचे मत आहे. यावरुन भाजपाचे नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय चांगला असल्याचे म्हटले आहे. तसेच रेडी रेकनरचे दर का जाहीर होत नाही याबाबत प्रश्न उपस्थितीत केला आहे.(criticism of the state government)

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय चांगला आहे. परंतु रेडी रेकनरचे दर अजूनही जाहीर का होत नाही आहेत. असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच रेडी रेकनरची फाईल पुण्याहून मुंबईला निघालेली ती अद्याप पोहचली नाही का ? पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून टोल गोळा करीत मुंबईत येत नाही ना? तसेच तिघडीच्या भांडणात ही फाईल अडकली तर नाही ना? असे विविध प्रश्न निर्माण करत महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे.

आशिष शेलारांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, निधीसाठी रोज केंद्र सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल कमी करीत, मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पण रेडी रेकनरच्या दरांचे काय? महसूल कमी करीत, मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला चांगले आहे पण रेडी रेकनरचे दर का घोषित करत नाही आहे.

तसेच रेडी रेकनरचे दर मार्चमध्ये जाहीर होणार होते. परंतु कोरोनामुळे जाहीर नाही झाले त्याची मुदतवाढ मे पर्यंत दिली. राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक, पुणे यांच्याकडे मे मध्ये ही फाईल तयार झाली. आता ऑगस्टही संपला तरी मंत्रालयापर्यंतही फाईल पोचलीच नाही. ह्या फाईलला पुणे ते मुंबई पोहचायला ३ महिने लागतात का असा सवाल उपस्थित केला आहे.