
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सणसणीत टोलेबाजी करत काँग्रेसवर निशाणा घातला आहे. “लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील अंतर्गत वादामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेलसा डावलले जात असल्याची चर्चा आहे. यावरुन भाजप नेते जहरी टीका करत काँग्रेसच्या दुख:वर घाव लागताना दिसत आहे.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सणसणीत टोलेबाजी करत काँग्रेसवर निशाणा घातला आहे. “लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तीच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे…🤓
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 18, 2020
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरूनच काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असा इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यषोमती ठाकूर यांनी दिला होता.
महाविकास आघाडीतील या वादावर टीका करत भाजप नेते काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.