BJP leaders retaliate against Sanjay Raut

धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा! जे सांगायचे ते थेट सांगा अन् पुरावे देऊन मोकळे व्हा! कर नसेल तर ‘डर’ कशाला? असे ट्विट करत भातखळकर यांनी थेट राऊतांवर निशाणा साधला आहे.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीच्या ईडी चौकशीच्या नोटीस नंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडताना भाजपला टार्गेट केले. यांनतर भाजप नेतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत पलटवार करत आहेत.

मी तोंड उघडले तर केंद्र सरकारला हादरा बसेल असे राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हंटले होते. यांनतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड, वाट कोणाची पाहताय? असा सवालच भातखळकर यांनी राऊतांना केला आहे.

धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा!
जे सांगायचे ते थेट सांगा अन् पुरावे देऊन मोकळे व्हा! कर नसेल तर ‘डर’ कशाला? असे ट्विट करत भातखळकर यांनी थेट राऊतांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन करताय. चांगले आहे लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे अशी टीकाही भातखळकर यांनी केली.

दरम्यान, ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असली, तरी केंद्र सरकारच्या दबावापुढे आम्ही झुकणार नाही. शिवसेना कधीच दबावाला बळी पडत नसल्याचं सांगत अशा प्रकारांना शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला.