‘पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्यातला २६ टक्के व्हॅट कमी करा’ शिवसेनेच्या टीकेला भातखळकरांनी दिले उत्तर

शिवसेनेने (shivsena) केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. शिवसेनेच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर(atul bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    पेट्रोल डिझेलचे भाव(fuel prize hike) कमालीचे वाढत आहेत. यावरून अनेक पक्ष टीका करत आहेत. शिवसेनेने (shivsena) केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. शिवसेनेच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर(atul bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे की, “सामना, संजय राऊत आणि अर्थशास्त्राचा जसा काडीचाही संबंध नाही तसा पेट्रोलच्या दराचा आणि रामवर्गणीचाही संबंध नाही. पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्य सरकारने आकारलेला २६ टक्के व्हॅट तर कमी करा.”

    तसेच, “सामनाकार बोरुबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असल्याच तर टक्केवारीशी आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीवरून त्यांना राम मंदिराचा चंदा आठवला, काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात २६ रुपये व्हॅट राज्य सरकारचा आहे तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका आणि मग मोदींवर टीका करा. मोदी जो टॅक्स गोळा करत आहेत त्यातील ४१ टक्के तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे लोकांना विनाकारण भरकटवायचं आणि खोटं बोलायचे उद्योग आता बोरुबहाद्दर संजय राऊत यांनी बंद करावे.” असं भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

    शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत!.