शुक्ला यांनी महाविकास आघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला आहे : भाजप नेते अतुल भातखळकर यांच्या व्टिटने खळबळ

काही दिवसांपूर्वी हैदाराबादमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रश्मी शुक्ला यांची चौकशी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकासआघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोटही अतुल भातखळकर यांनी केला.

    मुंबई: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकासआघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला, असा गौप्यस्फोट   भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

    काही दिवसांपूर्वी हैदाराबादमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रश्मी शुक्ला यांची चौकशी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकासआघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोटही अतुल भातखळकर यांनी केला.

    भातखळकर यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भातखळकर यांनी केला आहे. यापैकी एक अनिल म्हणजे देशमुख तर दुसरा अनिल म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे चेलेचपाटे आणि आणखी एक बडा नेता कोण असावा, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.