वेळ आली तर शिवसेना भवनही तोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता

माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान 5 नगरसेवक निवडून आणणार आहोत, असं प्रसाद लाड म्हणाले. किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही ते म्हणाले. शिवसेनेला ताकद देण्याचं काम आम्ही केलं आता त्यांची ताकद तोडायचं काम आम्ही करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

    दादरमधील Dadar शिवसेना भवनासमोरील राड्यानंतर shivsena bhavan rada भाजप-शिवसेनेत shivsena-BJP सुरू झालेला वाद शमत असतानाच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांनी नवे वक्तव्य केल्याने हा वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘आम्ही माहीममध्ये आलो तर त्यांना वाटते की आम्ही शिवसेना भवन फोडायला आलो की काय, पण वेळ आली तर शिवसेना भवन फोडू’ असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले आहे. लाड यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

    शिवसेनेला आम्ही ताकद दिली

    माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान 5 नगरसेवक निवडून आणणार आहोत, असं प्रसाद लाड म्हणाले. किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही ते म्हणाले. शिवसेनेला ताकद देण्याचं काम आम्ही केलं आता त्यांची ताकद तोडायचं काम आम्ही करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

    प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?

    “भाजपची ताकद काय आहे हे 2014 विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे. यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु”, असं लाड म्हणाले.