केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय परिवहन मंत्री, भाजपा नेते नितीन गडकरी माझे भाऊ आहेत. आयकर विभागाने जप्त केलेले सोने कमी किमतीत मिळवून देतो, अशी बतावणी करून एका इसमाला 5 लाख रुपयांनी गंडा घालणाऱ्या बाप-लेकाला विष्णू नगर पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली आहे. राजन आणि आनंद गडकरी अशे या बाप-लेकाचे नाव आहे.

    मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री, भाजपा नेते नितीन गडकरी माझे भाऊ आहेत. आयकर विभागाने जप्त केलेले सोने कमी किमतीत मिळवून देतो, अशी बतावणी करून एका इसमाला 5 लाख रुपयांनी गंडा घालणाऱ्या बाप-लेकाला विष्णू नगर पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली आहे. राजन आणि आनंद गडकरी अशे या बाप-लेकाचे नाव आहे.

    राजन आणि आनंदने अमोल पळसमकर यांना आमचे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सोन्याचे दुकान आहे. माझा भाऊ नितीन गडकरी मंत्री आहे. आयकर विभागात जे सोने पकडतात ते कमी किमतीत तुम्हाला माझे ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये, द्या अशी बतावणी केली होती.

    यावर विश्वास ठेवत फेब्रुवारी 2020 ला पळसमकर यांनी पाच लाखांचा चेक दोघांकडे सुपूर्द केला होता. एक ते दोन महिन्यात तुम्हाला तुमचे सोने मिळून जाईल, असे राजन यांनी सांगितले होते. परंतु, दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही. त्या दोघांकडे पैसे मागितले असता त्यांनी आज देतो, उद्या देतो असे सांगत टाळाटाळ केली.

    अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पळसमकर यांनी विष्णुनगर पोलिस ठाणे गाठत गडकरी पिता-पुत्रंविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बंगळूरूत बेड्या ठोकल्या. दोघांना 14 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहे.

    हे सुद्धा वाचा