समर्थकांच्या राजीनामा सत्रानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंना दिल्लीत पक्षश्रेष्ठींचे पाचारण

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचणार आहेत. नियोजित बैठकांसाठी जात असल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष नड्डा यांच्यासोबत बैठक आहे. दिल्लीतील नेत्यांशी पंकजा मुंडे यांची विस्तारानंतर चर्चा होण्याची शक्यता आहे.

    मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिल्यांनतर पंकजा यानी समर्थकांची मुंबईत येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचे भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले आहे.

    या पार्श्वभुमीवर, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे याना दिल्लीला पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत मुंडे यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    बीडमध्ये ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

    केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचणार आहेत. नियोजित बैठकांसाठी जात असल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष नड्डा यांच्यासोबत बैठक आहे.

    दिल्लीतील नेत्यांशी पंकजा मुंडे यांची विस्तारानंतर चर्चा होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये भाजपच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे