दिल्लीतील मोदी-ठाकरेंच्या बैठकीनंतर आता महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

दिल्लीत मोदी-ठाकरेंच्या बैठकीनंतर आता महाराष्ट्रात भाजपच्या कोअर कमिटीने एक महत्वाची बैठक बोलवली आहे. ही बैठक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या बैठकीचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित आहेत.

    दरम्यान, दिल्लीत मोदी-ठाकरेंच्या बैठकीनंतर आता महाराष्ट्रात भाजपच्या कोअर कमिटीने एक महत्वाची बैठक बोलवली आहे. ही बैठक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या बैठकीचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

    दरम्यान, फडणवीसांनी बोलावली बैठक ही पक्षांतर्गत सर्वसाधारण बैठक असून त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीशी काहीही संबंध नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रामध्ये समन्वयानं चर्चा होत असेल तर याचं आम्हाला चांगलच वाटेल, चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही दरेकर म्हणाले.