sachin sawant

सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या महिलेने ओशीवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली. हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपातील काही नेते टेंशनमध्ये आले असतील, असं ट्विट काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. या ट्विटच्या माध्यामातून त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. भाजप महिला आघाडीकडून धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी होत आहे. या मगाणीनंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या महिलेने ओशीवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.
“सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.

वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल” असे पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपातील काही नेते टेंशनमध्ये आले असतील, असं ट्विट काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. या ट्विटच्या माध्यामातून त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.