electricity

  • भाजप नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने वीजबीलांत केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी. तसेच सर्व जनतेला वीजबील भरण्यास ६ महिन्यांचा कालावधी द्यावा. लॉकडाऊनमधील वीजबीलांत १०० युनिटपर्यंत सुट द्यावी. अशी मागणी या याचिकेत केली आहे. विद्युत नियामक आयोगापुढे अशा प्रकराची याचिका भाजपचे मादी खासदार डॉ. किरीट सोमैय्या आणि ठाणे शहर भाजपा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दाखल केली आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून देश लॉकडाऊन करण्यात आला होता. लॉकडाऊन असल्यामुले सर्वसामान्यांचा व्यवसाय तसेच नोकरी,धंदा बंद होता. त्यामुले अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये वाढीव वीज बीलाचाही सामना करावा लागत आहे. वाढीव वीज बीलांमुळे अनेक लोकांचे कंबरडं मोडलं आहे. या वाढीव वीज बीलाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. 

भाजप नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने वीजबीलांत केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी. तसेच सर्व जनतेला वीजबील भरण्यास ६ महिन्यांचा कालावधी द्यावा. लॉकडाऊनमधील वीजबीलांत १०० युनिटपर्यंत सुट द्यावी. अशी मागणी या याचिकेत केली आहे. विद्युत नियामक आयोगापुढे अशा प्रकराची याचिका भाजपचे मादी खासदार डॉ. किरीट सोमैय्या आणि ठाणे शहर भाजपा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दाखल केली आहे. 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे आणि २० ते २५ टक्के वीज दरवाढ केली आहे ती त्वरित मागे घ्या अशी मागणी केली आहे. किरिट सोमैय्या यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय बंद आहेत तरी त्यांना अव्वाच्या सव्वा वीज बील पाठवण्यात आले आहे. यामुळेच वीज बीलांकडे आयोगाचे लक्ष वेधले आहे. तसेच ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या बीलांची फेरतपासणी करावी, वीज बीलांची दरवाढ रद्द करण्यात यावी, वीज बील न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे तो खंडित करु नये अशी मागणी केली आहे. तसेच कोरोनाकाळात वीज बील १०० युनिटपर्यंत माफ करण्यात य़ावा. वीज बील भरण्यासाठी ग्राहकांना ६ महिन्याचा कालावधी देण्यात यावा अशा माण्या याचिकेत केल्या आहेत.