मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाजप नेत्यांचा घुसण्याचा प्रयत्न, काही आंदोलक मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने (BJP) आज राज्यभर तीव्र आंदोलन केलं आहे. राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर (Siddhivinayak temple in Mumbai) जे आंदोलन झालं त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा (Social Distance) फज्जा उडालेला पाहण्यास मिळाला आहे. तसेच भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.

भाजपाच्या नेत्यांकडून गणपतीची आरती करत आंदोलन करण्यात आलं आहे. परंतु मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाजप नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मंदिर प्रवेशासाठी सिद्धिविनायक मंदिरासमोर भाजपची निदर्शने पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे बार उघडले गेले आहेत, रेस्तराँ उघडले गेले आहेत मग मंदिरं आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी विचारला.

परभणीतही धार्मिक स्थळ सुरु करण्यासाठी आज भाजपचं आंदोलन होत आहे. जिल्ह्याभरातील धार्मिक स्थळ सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्याभरातील आज ५० मंदिरांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. मंदिरं उघडण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नामदेव पायरीसमोर आज भाजपचं आंदोलन आहे.