“चेहरा भोळा अन् भानगडी सोळा”, कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांवर भाजपच्या ”या” नेत्याचा गंभीर आरोप

मेट्रोचा आरेतील कारशेड वादग्रस्त ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, येथेही कारशेड उभारणीवरून वाद निर्माण होताना दिसत आहे. कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद निर्माण झाला असून, न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान न्यायालया देण्यात आलेल्या माहितीचा हवाला देत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

    मुंबई : आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास प्रचंड विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने कारशेड आरेतून कांजूरमार्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून बरंच राजकारणंही होताना दिसत आहे. कांजूरमार्ग येथील जागेच्या मालकीवरून गेले अनेक दिवस वाद सुरुच आहे.

    दरम्यान, या कारशेडसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत एमएमआरडीएने दिलेल्या माहितीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काही सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मेट्रोचा आरेतील कारशेड वादग्रस्त ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, येथेही कारशेड उभारणीवरून वाद निर्माण होताना दिसत आहे. कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद निर्माण झाला असून, न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान न्यायालया देण्यात आलेल्या माहितीचा हवाला देत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

    तसेचं ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने ३ हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?,” असे सवाल आशिष शेलार यांनी केले आहेत.

    कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी… खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.