ओबीसीच्या इम्परिकल डाटाच्या मुद्यावर नकारात्मक भूमिका घेणाऱ्या भाजपचे नुकसान जिल्हा परिषद निकालांचा कौल

केंद्रापासून राज्यापर्यंत नकारात्मक भुमिका घेणाऱ्या भाजपला नुकसान झाल्याचे  आकडेवारीतून दिसत आहे. तर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका न लढता देखील त्यांच्या चांगल्या जागा निवडून आल्याने सत्ताधारी गोटात आनंदाचे वातावरण आहे.

  मुंबई: राज्यात ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या सहा जिल्हा परिषद पोटनिवडणुकांच्या निकालांचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात ओबीसीच्या इम्परिकल डाटाच्या मुद्यावर केंद्रापासून राज्यापर्यंत नकारात्मक भूमिका घेणाऱ्या भाजपला नुकसान झाल्याचे  आकडेवारीतून दिसत आहे. तर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका न लढता देखील त्यांच्या चांगल्या जागा निवडून आल्याने सत्ताधारी गोटात आनंदाचे वातावरण आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार या निकालांनुसार धुळे – १५ जागांपैकी भाजप८, शिवसेना २, राष्ट्रवादी ३, काँग्रेस २, इतर शून्य अशी स्थिती राहिली आहे. तर निवडणुकीपूर्वी आरक्षण रद्द झाले त्यावेळी पक्षीय बलाबलानुसार धुळे जिल्हा परिषदेत एकुण १५ जागांमध्ये भाजपकडे ११ शिवसेना 0२ आणि काँग्रेस 0२ अशी स्थिती होती. म्हणजेच धुळ्यात भाजपला ३ जागांचे नुकसान झाले आहे तर राष्ट्रवादीचा फायदा झाला आहे.

  नंदूरबारच्या जाहीर जिल्हापरिषद निकालांनुसार एकूण ११  जागांमध्ये भाजपला ४, शिवसेना ३, राष्ट्रवादी १, काँग्रेस ३ इतर 0  असा निकाल लागला आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षण रद्द झाले त्यावेळच्या बलाबलानुसार एकूण ११ जागांमध्ये शिवसेना  २, काँग्रेस २ तर भाजपकडे ७ जागा होत्या. आता भाजपच्या जागा वाढल्या असून इथेही भाजपला तीन जागांचे नुकसान झाले आहे.

  अकोला जिल्हा परिषदेत एकूण १४ पैकी भाजप १ शिवसेना १ राष्ट्रवादी २ काँग्रेस १ वंचित ९ असा निकाल लागला आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वएकूण १४ पैकी वंचित कडे ६ जागा होत्या त्यात ३ वाढल्या  आहेत. तर वंचित समर्थित अपक्ष : २ होते. भाजप कडे ३ जागा होत्या त्यांचे २ जागांचे नुकसान झाले आहे. तर शिवसेना १ राष्ट्रवादी १ काँग्रेस १ जागेवर कायम राहिले आहेत.

  वाशिम जिल्हयात  एकूण १४ पैकी भाजप २, शिवसेना १, राष्ट्रवादी ५, काँग्रेस २, इतर  ४ असा कौल मतदारांनी दिला आहे. मात्र निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या १४ जागांमध्ये शिवसेना १, काँग्रेस १, राष्ट्रवादी ३, भाजप २, वंचित बहुजन आघाडी ४, इतर २ तर अपक्ष १ असे चित्र होते येथे राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

  नागपूर जिल्हा परिषदेत १६ जागांमध्ये भाजपला ३, शिवसेना ०, राष्ट्रवादीला २ काँग्रेसला ९, इतर २ असा कौल मतदारांनी दिला आहे. भाजपचा गढ समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीला कॉंग्रेसने मात दिल्याचे चित्र आहे निवडणुकीपूर्वी येथे पक्षीय संख्याबळ असे होते. एकूण जागा १६, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ७, शेकाप १, भाजप ४.

  मुंबई जवळच्या पालघर जिल्ह्यात१५ जागांपैकी भाजप ५, शिवसेना ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ० इतर १ असा मतदानाचा कौल आहे आरक्षण रद्द होण्यापूर्वी या जिल्हा परिषदेत १५ जागंमध्ये शिवसेना ३, राष्ट्रवादी ७, भाजप ४, माकप १ असे संख्याबळ होते.